मराठीच्या अंगणातच मराठीचा पराभव! ९४ हजार विद्यार्थी नापास; अभिजात दर्जाच्या उंबरठ्यावर मराठीची ही कसली दैना?

मुंबई: एकीकडे मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र साजरा करत असताना, दुसरीकडे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील तब्बल ९४ हजार विद्यार्थी चक्क आपल्या मातृभाषेत, म्हणजेच मराठी विषयात नापास झाले आहेत. ही केवळ आकडेवारी नसून मराठी भाषेच्या भवितव्यासाठी ही एक मोठी ‘धोक्याची घंटा’ मानली जात आहे.
सणसणीत वास्तव: अभिजात भाषेच्या घरावरच निखारे!
ज्या भाषेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे, ज्या भाषेने ज्ञानेश्वर-तुकारामांचा वारसा जपला, त्याच मातीतील मुले आज मराठी लिहायला-वाचायला विसरत आहेत का? असा जळजळीत प्रश्न या निकालाने उपस्थित केला आहे. ९४ हजार ही संख्या छोटी नाही. इंग्रजी किंवा गणितात विद्यार्थी नापास होणे समजण्यासारखे असले, तरी मातृभाषेतच इतक्या मोठ्या प्रमाणावर अपयश येणे हे मराठी अस्मितेसाठी लाजीरवाणे ठरत आहे.
या परिस्थितीची काही प्रमुख कारणे:
इंग्रजी माध्यमाकडे ओढा: पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढल्याने घरात आणि शाळेत मराठीचा वापर कमी होत आहे.
वाचनाचा अभाव: मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी कमी झाली असून, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष होत आहे.
व्याकरणाकडे दुर्लक्ष: परीक्षेत मराठी व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गुण गमावत असल्याचे दिसून येते.
अभिजात दर्जा आणि वास्तव: एकीकडे आपण भाषेचा उत्सव साजरा करत आहोत, पण दुसरीकडे शिक्षणाच्या पायातच मराठी भाषा कच्ची राहत आहे.हि बाब अतिशय गंभीर आहे,




