Uncategorized

बदलापूर! पत्रकार अमित गायकवाड तेजस कांबळे आणि रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वृध्दाचे प्राण वाचले,,

बदलापूर मध्ये पत्रकार आणि रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध व्यक्तीच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला असल्याची माहिती समोर आली आहे,
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती ही बदलापूर पुर्व खरवई परिसरात राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे,आज संध्याकाळी कर्जत वरुन येणाऱी लोकल गाडी बदलापूर स्थानकात येत असताना ही वृध्द व्यक्ती आत्महत्या करण्याच्या दृष्टीने थेट लोकल गाडी खाली जाऊन झोपली असताना गाडीतील प्रवाशांच लक्ष या प्रकारा कडे गेले त्याच वेळी पत्रकार अमित गायकवाड आणि पत्रकार तेजस कांबळे हे देखील त्या ठिकाणी काही कामा निमित्त गेले असताना त्यांच्या देखील हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या मदतीने तातडीने या वृद्ध व्यक्तीला रेल्वे गाडी खालुन जखमी अवस्थेत बाहेर काढले, स्टेशन परिसरातच हा प्रकार घडल्याने रेल्वे सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी दाखल झाले होते, वृद्ध व्यक्तीला सुखरूप बाहेर काढून त्यांची विचारपूस करत असताना “आपण घरच्यांना नको झालो आहे “म्हणून मला माझे जीवन संपावयचे आहे असे या वृद्धाने आत्महत्यचे कारण सांगताना या वेळी सांगितले, परंतु जागरूक पत्रकार अमित गायकवाड तेजस कांबळे आणि काही रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे होणार अनर्थ टळला, रेल्वे पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीला तातडीने पुढील उपचारासाठी पाठवले असून पत्रकार अमित गायकवाड आणि पत्रकार तेजस कांबळे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसत आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!