बदलापूर मध्ये माया ब्लड बॅंके नंतर आता जे जे महानगर रक्तपेढीचा परवाना रद्द, एफडीएची मोठी कारवाई,,
रुतिकेश रोकडे! प्रतिनिधी

कुळगाव बदलापूर शहरातील रक्तपेढ्यां मध्ये सुरू असलेल्या अंधाधुंद कारभाराची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याची दिसून येत आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून या रक्तपेढ्यांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे, या मुळे रुग्णांच्या जिवनाशी खेळ खेळण्याचा हा एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही,नियमा प्रमाणे रक्त संकलित केल्या नंतर रक्त आणि रक्तघटक सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तापमाना बाबत कोणतीही उपाययोजना या रक्तपेढ्यांमध्ये केली जात नाही,रक्त संकलित करताना वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या कचऱ्याचे नियोजन देखील अत्यंत अयोग्य पद्धतीने केले जाते, उपकरणांचे कॅलिब्रेशन न करता रक्त संकलित केलेल्या दस्तऐवजां मधिल नोंदिंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे,एकुणच रक्तदात्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही मुलभूत सुविधा या रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध नाहीत,याच रक्तपेढी मधुन कोणतीही पडताळणी न करता ५० रक्त पिशव्या ह्या माया ब्लड बॅंकेला अनाधिकृत पध्दतीने दिल्या असल्याचा गंभीर प्रकार देखील घडला आहे, एफडीए ने मागच्याच काही दिवसांपूर्वी या दोन्ही रक्तपेढींना निलंबनाची कारवाई करत नोटीस बजावून या बाबत स्पष्टीकरण मागितले होते, परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर एफडीए ला मिळाले नसल्याने सार्वजनिक हितासाठी एफडीए ने रक्तपेढ्याचा परवानाच कायम स्वरुपी बंद करून टाकला आहे, या मुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रक्तपेढी संचालकांर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संपूर्ण बदलापूर होताना दिसत आहे, आता एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे हे याबाबत कोणता निर्णय घेतात हे बघने आता महत्वाचे ठरणार आहे,




