अच्छे दिन’चा फुगा फुटला! गॅस सिलेंडरचा तुटवडा, “लाडक्या बहिणींना “पुन्हा चुलीकडे वळावे लागणार,,व्यवसायीक हवालदिल,,

नवी दिल्ली/मुंबई:
देशात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. एकीकडे केंद्र सरकार “देशात गॅसचा तुटवडा नाही” असे दावे करत असताना, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक भर उन्हात गॅस एजन्सीबाहेर तासनतास रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जनतेच्या जखमेवर मीठ:
दरवाढीचा मोठा धक्का: मार्च २०२६ च्या सुरुवातीलाच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची, तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये ११५ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला हा सरकारी दिलासा नसून मोठा दणका ठरला आहे.
बुकिंग नियमांत जाचक बदल: गॅस टंचाईवर नियंत्रण मिळवण्याऐवजी सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांत बदल केले आहेत. आता ग्राहकांना रिफिलसाठी २५ ते ४५ दिवसांपर्यंत वाट पाहावी लागत आहे, ज्यामुळे कुटुंबांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
काळा बाजार आणि लुट: टंचाईचा फायदा घेत अनेक शहरांमध्ये सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला असून, काही ठिकाणी १८०० रुपयांपर्यंत चढ्या दराने सिलेंडर विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. सरकार या काळाबाजाराला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
हॉटेल आणि उद्योगांवर संकट: व्यावसायिक गॅस न मिळाल्यामुळे अनेक छोटे हॉटेल व्यावसायिक आणि खाणावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पर्याय म्हणून नागरिक पुन्हा कोळसा आणि लाकडांच्या चुलीकडे वळत असून, लाकडांचे भावही दुप्पट झाले आहेत.
निष्कर्ष
पश्चिम आशियातील युद्धाचे कारण देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याची टीका विरोधक करत आहेत. “उज्ज्वला” योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचवल्याचा डांगोरा पिटणाऱ्या सरकारने आता जनतेला गॅसअभावी उपाशी राहण्याची वेळ आणली आहे, अशी भावना जनमानसात उमटत आहे.




