डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात ड्राय डे जाहीर करा ,, अन्यथा पॅंथर स्टाईलने दारू दुकाने बंद करु,,कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शासन जबाबदार – पँथर साईनाथ खरात

ठाणे, प्रतिनिधी
भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ठाणे शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर साईनाथ खरात यांनी केली .
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असते.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी १४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवून ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर साईनाथ खरात यांनी केली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, अन्यथा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील छोट्या-मोठ्या पक्ष घटकाकडून व समाज बांधवाकडून पॅंथर स्टाईलने दारु दुकाने बंद करु,, त्या नंतर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शासनच जबाबदार असेल असे देखील निवेदनात पँथर साईनाथ खरात यांनी नमूद केले.




