Uncategorized

बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘आठवडे बाजार’ पुन्हा सुरू होणार? विक्रेत्यांचे पालिकेला निवेदन,,

बदलापूर:
बदलापूर शहरात गेल्या काही काळापासून बंद असलेले आठवडे बाजार पुन्हा एकदा गजबजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागांतील आठवडे बाजार पुन्हा सुरू करावेत, या मागणीसाठी विक्रेत्यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांच्या कडे निवेदन सादर केले आहे
फेरीवाला धोरण आणि इतर तांत्रिक कारणांमुळे बदलापुरातील अनेक आठवडे बाजारांवर निर्बंध आले आहेत. मात्र, यामुळे शेकडो स्थानिक विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुळे आता विक्रेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा सौ रुचिता घोरपडे यांची भेट घेऊन बाजार सुरू करण्याची विनंती केली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाची तयारी विक्रेत्यांनी दर्शवली आहे.

जर पालिकेने यावर सकारात्मक निर्णय घेतला, तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांतील नागरिकांना ताजी फळे, भाजीपाला आणि घरगुती वापराच्या वस्तू पुन्हा एकदा एकाच ठिकाणी रास्त दरात मिळतील.
प्रशासनाकडून लवकरच यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि छोटे विक्रेते या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!