बदलापूर! डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक भेट, पालिका प्रशासन साजरे करणार शताब्दी वर्ष _

कुळगाव बदलापूर नगरपालिकची मागासवर्गीय समितीची पहिलीच बैठक नगरपालिका सभागृहात नुकतीच पार पडली असून, येत्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे शंभर (३ मे १९२७ )वर्षा पूर्वी कुळगाव बदलापूर शहराला भेट दिली होती, या घटनेला आता शंभर वर्ष पूर्ण होत येत असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा “शताब्दी सोहळा “साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मागासवर्गीय समितीच्या सभापती हर्षली गायकवाड यांनी दिली आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर शहरातील सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी बदलापूर गाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सुरू केला होता,ती परंपरा आज देखील कायम आहे, तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शास्त्री पालये यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले होते, या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती, त्या वेळी बदलापूर शहर तसेच गावातील विविध समस्यांवर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे महान कार्य लक्षात घेऊन, बदलापूर नगरपालिकेच्या मागासवर्गीय समितीने घेतलेला निर्णय अतिशय समाधानकारक आणि अभिमानास्पद आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने, शहरातील आदिवासी दलित सोशित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मागासवर्गीय समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे,शहर तसेच शहराला लागून असलेल्या आदीवासी पाडे, दलित वस्तीत , पोषण आहार, औषध वितरण, सार्वजनिक शौचालय तसेच संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील विशेष प्रयत्न या निमित्ताने केले जाणार असल्याचे सभापती हर्षली गायकवाड यांनी सांगितले आहे, आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच हे सभापती पद भूषवले असुन दलित आदिवासी यांच्या उन्नतीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे या वेळी हर्षली गायकवाड यांनी म्हटले आहे,




