राजनीति

आरक्षणाचे ‘क्रेडिट’ घेणाऱ्या भाजपला आरसा दाखवण्याची वेळ; २०१४ पासूनच्या कारकीर्दीचा हिशोब द्या_अविनाश देशमुख

नवी दिल्ली/मुंबई:
महिला आरक्षणावरून विरोधकांना ‘व्हिलन’ ठरवून राजकीय पोळी भाजणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी आपली स्वतःची २०१४ पासूनची कारकीर्द तपासून पाहण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे,”नारी शक्ती वंदन अधिनियमा”चा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक इतकी वर्षे का रखडवले आणि आता त्यात तांत्रिक पेच का निर्माण केले, याचे उत्तर जनतेला देण्याची वेळ आली आहे.
विरोधक नव्हे, भाजपच्याच ‘इच्छे’चा अभाव?
२०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार असतानाही भाजपने महिला आरक्षणाचे विधेयक शेवटच्या टप्प्यात का आणले, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा हे विधेयक संसदेत आले, तेव्हा त्यात ‘जनगणना’ आणि ‘मतदारसंघांची पुनर्रचना’ (Delimitation) यांसारख्या अटी घालून ते भविष्यात ढकलण्याचे राजकारण कोणी केले? असा प्रश्न अविनाश देशमुख यांनी उपस्थित केला आहे . ‘कथनी आणि करणी’ मधील हा फरक भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय ठरायला हवा.
२०१४ पासूनचा कारभार आणि रखडलेली आश्वासने
भाजपच्या १० वर्षांच्या कार्यकाळात महिलांच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वापर्यंत अनेक दावे केले गेले. मात्र, संसदेत प्रत्यक्ष आरक्षण लागू करण्याऐवजी केवळ ‘श्रेय’ लाटण्यासाठी विरोधकांना लक्ष्य करणे, हे भाजपचे जुनेच धोरण राहिल्याची टीका अविनाश देशमुख यांनी केली आहे. २०१० मध्ये युपीए सरकारने राज्यसभेत हे विधेयक मंजूर केले होते, तेव्हा विरोधात असलेल्या भाजपने त्यास पूर्ण पाठबळ का दिले नाही? हे सत्य आता जनतेसमोर येत आहे.


विधेयक का नाकारले? चिंतन करा,,असा सल्ला देशमुख यांनी दिला आहे,
आज विरोधकांवर टीका करताना भाजपने हे विसरू नये की, लोकशाहीत केवळ संख्याबळ असून चालत नाही, तर नियत असावी लागते. महिला आरक्षण विधेयकात ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने अनेक पक्षांनी त्यावर आक्षेप घेतले होते. या त्रुटी दूर करण्याऐवजी, विरोधकांना विकासविरोधी ठरवून स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न भाजपने थांबवावा.
महिलांचा सन्मान हा केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो कृतीत कधी उतरणार? २०१४ पासूनची आपली निष्क्रियता झाकण्यासाठी विरोधकांना ‘व्हिलन’ ठरवणे आता चालणार नाही. भाजपने सत्तेच्या अहंकारातून बाहेर पडून आपल्या कारकीर्दीचे चिंतन करावे, हीच आजच्या काळाची गरज असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!