देश

२० मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद; ‘या,,,,,’ मागण्यांसाठी केमिस्ट आक्रमक,,,

 

ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अनैतिक व्यावसायिक धोरणांविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) या संघटनेने २० मे २०२६, बुधवार रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील सुमारे १२.५ लाख औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.

बंद पुकारण्याचे मुख्य कारण

औषध विक्रेत्यांच्या मते, बेकायदेशीररीत्या सुरू असलेली ऑनलाइन औषध विक्री ही रुग्णांच्या आरोग्यासाठी घातक आहे. तसेच, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या औषधांवर भरमसाठ सवलती देऊन छोट्या विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत. या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी हा ‘बंद’ पुकारण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या:
ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी:
बेकायदेशीर ऑनलाइन फार्मसी त्वरित बंद कराव्यात.

अव्यावसायिक सवलतींना लगाम:

कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी डिस्काउंटवर बंदी आणावी.

बनावट औषधांपासून संरक्षण:

बनावट आणि असुरक्षित औषधांच्या विक्रीवर कडक कारवाई करून देशाचे आरोग्य वाचवावे.जीएसआर अधिसूचना रद्द करा: सरकारने यापूर्वी लागू केलेल्या जीएसआर ८१७ आणि जीएसआर २२० (कोविड काळातील सवलती) या अधिसूचना मागे घ्याव्यात.

 

नागरिकांसाठी आवाहन

२० मे रोजी मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी आपली आवश्यक आणि नियमित लागणारी औषधे १९ मे पर्यंतच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन केमिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. तथापि, बंद दरम्यान अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.कुळगाव बदलापूर केमिस्ट वेलफेअर असोसिएशनसह महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने या बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!