Uncategorized

बदलापूर! मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या पत्राला मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या कडून वाटाण्याच्या अक्षता,,,

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्देशित केलेल्या पत्रालाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे,
कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पासून नगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे निष्कासित करण्याची मोहीम सुरू केली होती,मा, उच्च न्यायालयाने जोरदार फटकार मारल्यानंतर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शहरातील सुमारे चारशे अनाधिकृत आणि अतिक्रमण बांधकामे जमीनदोस्त करण्याची घोषणा केली होती, त्या बाबतचा अहवाल देखील मा, उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असल्याचे समजते, परंतु प्रत्यक्षात मात्र थातुरमातुर कारवाई करत शहरातील जवळपास दोनशे अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे, या पुर्वी देखील बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत, या साठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, या वेळी देखील कारवाईला मोठे स्वरूप देऊन अर्धवट धडक कारवाई करण्यात आली आहे, शहरातील वाहन कोंडीची समस्या दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, परंतु कारवाई केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा “जैसे थे “अनाधिकृत बांधकामे पुन्हा उभी राहिली आहेत, अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांनी जर त्या ठिकाणी पडलेले आपले सामान दिलेल्या मुदतीत उचलुन जागा रिकामी केली नाही तर सदरचे सामान आरोग्य विभागाच्या माध्यमातून उचलुन जप्त करुन अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम करणारे यांच्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्याचा कायदा आहे, परंतु मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी अक्षरशः हा कायदा धाब्यावर बसवून, अशा प्रकारे कोणतीही कारवाई केली नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेली मोहीम कुचकामी ठरली असून अचानक ही मोहीम थांबल्याने ऊलट अर्थि पालिकेचा लाखो रुपयांचा निधी खड्ड्यात घातला आहे, या बाबत मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास ही बाब एका निवेदनाद्वारे आणुन दिली असताना नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश मा मुख्यमंत्री यांनी मुख्याधिकारी यांना दिले असताना देखील, पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी मा मुख्यमंत्री यांनी निर्देशित केलेल्या पत्रालाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे दिसून आले आहे, या मुळे पालिका प्रशासनाने अशा प्रकारे कारवाईचे ढोंग करुन नागरिकांच्या घामातून भरलेल्या कराच्या माध्यमातून जमा झालेला पैसा अशा प्रकारे वाया घालवायचा अधिकार मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,आता वरिष्ठ स्तरावरुन या बाबत कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!