बदलापूर!अखेर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडले मुख्याधिकारी मारोती गायकवाड,,, अतिक्रमण कारवाईला स्थगिती,,

मा, उच्च न्यायालयाने जोरदार फटकार दिल्या नंतर कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी ॶॅक्शन मोडवर येऊन बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांवर तुटून पडले होते, दोन दिवसात जवळपास दोनशे अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त करून मुख्याधिकारी यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची आजवरचा सर्वात मोठी कारवाई असल्याचे सिद्ध केले होते,, परंतु कारवाई करताना अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकाम असे दोन्ही प्रकार आहेत, अतिक्रमण म्हणजे सरकारी जागेवर कब्जा करून केलेले बांधकाम तर अनाधिकृत म्हणजे स्वतःच्या मालकीच्या जागेत नगरपालिकेची परवानगी न घेता केलेले बांधकाम, अशा दोन्ही बांधकामांवर मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांनी जोरदार हल्ला चढवला आणि एकामागे एक अशी बांधकामे जमीनदोस्त होण्याची सुरुवात झाली,,पण,,सरकारी जागा आणि मालिकीच्या जागेत शासनाची परवानगी घेऊन बांधण्यात आलेली बांधकाम ही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे नातेवाईक किंवा लोकप्रतिनिधी यांचेच शुभचिंतक असल्याने,, लोकप्रतिनिधींची चांगलीच तारांबळ उडाली, सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर त्यांच्याच हितचिंतकांची नाराजी ओढवली, आणि ही अनाधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी सरसावलेल्या लोकप्रतिनिधी यांनी मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांची भेट घेऊन दबाव तंत्राचा वापर करून ही कारवाई रोखण्यासाठी भाग पाडले,,
हि कारवाई सात दिवसांसाठी रोखली असल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी या पुढे हि कारवाई सुरू राहिल असे वाटत नाही,कारण, सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी शक्कल लढवून लवकर मान्य न होणारा प्रस्ताव मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांच्याकडे ठेवला आहे,जी “अनाधिकृत बांधकामे झाली आहेत ती परवानगी देऊन अधिकृत करा”असा प्रस्ताव सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी ठेवला आहे,आता ही प्रक्रिया एवढ्या जलदगतीने होणे शक्य नाही,, त्या मुळे या पुढे अनाधिकृत अतिक्रमण बांधकामांवर या पुढे कारवाई होणारच नाही,, सत्ताधारी पक्षाकडून कदाचित उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करुन वेळ मागुन घेण्याची प्रक्रिया होईल, त्या मुळे कारवाई थांबली म्हणजे थांबली,,आता शक्यता नाहीच,,आता ज्या ठिकाणी अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम झाली आहेत त्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पुन्हा तोडलेली बांधकाम ऊभी केली जातील आणि बदलापूर शहराच बकाल शहरात रुपांतर होईल , मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांनी बदलापुरातील नागरिकांना मध्ये जो विश्वास निर्माण केला होता तो आता धुळीला मिळाला आहे,बाकी जनता सुज्ञ आहे,,,



