बदलापूर!शिवसेना प्रभाग क्रमांक ३ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
शनिनगर परिसरात विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे _वामन म्हात्रे

आज प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ बदलापूर येथील मोहन तुलसी विहार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात हेंद्रेपाडा येथील श्री चिंतामणी मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन करण्यात आली आणि गणरायाच्या आशीर्वादाने या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्याची सुरुवात झाली.

या प्रसंगी उमेदवार वरूण म्हात्रे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सौ. सपना जगदीश कुडेकर यांच्या प्रभाग क्रमांक ३ येथील नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ वीणा वामन म्हात्रे तसेच गटनेते श्रीधर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांसमोर विकास, प्रामाणिकपणा आणि बदलाचा ठोस संदेश देण्यात आला. यावेळी भाषणादरम्यान वामन म्हात्रे यांनी स्पष्टपणे सांगितले की “वामन म्हात्रे जे बोलतो ते करून दाखवतो, दिलेला शब्द कधीच मोडत नाही.” युतीच्या चर्चांना आता विराम देण्याची वेळ आली असून, शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम राहून नागरिकांसाठी काम करणे हेच पुढील उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शनिनगर परिसरात विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, कारण लोकांवर अन्याय करण्याचा काळ संपला आहे. “शनिनगरमधील लोकं आता अन्याय करणाऱ्यांना खाली उतरल्याशिवाय राहणार नाहीत,” असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी प्रभाग क्रमांक ३ मधून सुरू असलेली वसुली कायमस्वरूपी बंद करण्याचा शब्द देण्यात आला — “३ डिसेंबरनंतर या प्रभागात वसुली थांबणार, हा माझा शब्द आहे.”असे वामन म्हात्रे यांनी म्हटले आहे,
कोरोना काळात विरोधक घरात बसून होते, परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र जनतेच्या अडचणीत धाव घेतली — हीच खरी जनसेवा असल्याचे वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.
आज प्रभाग क्रमांक ३ अजूनही विकासाच्या बाबतीत मागे आहे, मात्र येत्या काळात या प्रभागाचा कायापालट होईपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. नागरिकांच्या सहकार्याने आणि विश्वासाने बदलाची नवी पहाट उजाडणार आहे, हा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.



