पीपल्स एज्युकेशन सोसायटी ला 500 कोटी निधी देण्याचा राज्य सरकार चा निर्णय स्वागतार्ह ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दिनांक 15 ~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व महाविद्यालय वसतिगृह इमारतींच्या विकासासाठी राज्य सरकार ने 500 कोटी निधी ची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकार चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांचे आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन म्हणून आभार मानत असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी राज्य सरकारने 500 कोटींची तरतूद करून मुंबई; छत्रपती संभाजी नगर आदी ठिकाणच्या महाविद्यालये आणि वसतिगृहांची दुरुस्ती विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या मध्ये मुंबईतील वडाळा येथील सिद्धार्थ हॉस्टेल च्या विकासाचा समावेश नाही. सिद्धार्थ हॉस्टेल हे आंबेडकरी चळवळीचे ऐतिहासिक केंद्र होते.ते वसतिगृह उभारण्यासाठी 72कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. सिद्धार्थ हॉस्टेल उभारणीचा प्रस्ताव या 500 कोटींचा योजनेत नाही त्याचा या योजनेत समावेश करून सिद्धार्थ हॉस्टेल उभारण्यासाठी वेगाने काम व्हावे अशी अपेक्षा न. रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
पीपल्स एज्युकेश सोसायटी च्या महाविद्यालये वसतिगृहे शाळा या इमरती जीर्ण झालेल्या इमारती नव्याने उभारण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा विकास करण्यासाठी 500 कोटींच्या तरतुदीची आपण मागणी केली होती.ती मागणी राज्य सरकार ने त्वरीत पूर्ण केलुबद्दल आपण राज्य सरकार चे आणि सर्व मंत्री अधिकाऱ्यांचे आभारी आहोत.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी आणखी 300कोटींची तरतूद
करून एकूण 800 कोटी निधी पीपल्स एज्युकेशन सोसायटी विकासासाठी द्यावा अशी मागणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन ना.रामदास आठवले यांनी केली आहे.


