बदलापूर! वारस नसल्या बाबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून समाचार ,,
सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

कुळगाव बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत, कोणत्याही क्षणी या निवडणुकीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे,अशातच महायुती मधिल मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्या मध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांना अप्रत्यक्ष लक्ष करत त्यांच्या वारसा बाबत वक्तव्य केले आहे, या मुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः महिला पदाधिकारी यांनी वामन म्हात्रे यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे,सोशल मीडियावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी सुरू आहेत, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मिनल मोरे यांनी देखील वामन म्हात्रे यांना लक्ष करत खडे बोल सुनावले आहेत तर भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपा शहर अध्यक्ष किरण भोईर यांनी सोशल मीडियावर वामन म्हात्रे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे, परंतु वामन म्हात्रे यांनी हे वक्तव्य आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात केले नसल्याचे शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे, परंतु वामन म्हात्रे यांनी वारस नसल्या बाबत केलेले वक्तव्य हे आमदार किसन कथोरे यांच्या साठी नसले तरी ते कोणत्याही नेत्यांसाठी करणे योग्य आहे का,? या बाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,




