विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेगळी ट्रस्ट रजिस्टर करा,,
अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी बांधवाची मागणी
अकोले (प्रतिनिधी) काल दि . १४/९/२०२५ रोजी दुपारी ठिक ३ वा. अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने आज अकोले रेस्ट हाऊस येथे वरील विषयांवर चर्चा सत्र म्हणून महत्त्व पुर्ण बैठकीचे नियोजन आंबेडकरी चळवळीचे भुषण रिपाइं चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजयराव वाकचौरे तथा भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते!

या विचार मंथन बैठकीचे अध्यक्षस्थान मोग्रस गावचे सुपुत्र ,,,,,पण सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मा- सुरेशराव जगधने साहेब यांनी भुषविले!
यावेळी अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते!
यावेळी उपस्थित. सर्वच मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करतांना आता पर्यंत खुप वेळा आपण सर्वांनी ज्यांच्या वर विश्वास ठेवून गेली २ वर्षं ८ महीणे आणि ९ दिवस त्यांच्या भुलथापांना बळी पडलो विश्वास ठेवला नको मतभेद नको दुफळी पण याचा काहीच फायदा झाला नाही आणि अजुन ही आपण हे विभाजन होऊ अशी आशा बाळगली तरी यांच्या तुन काहीच साध्य होण्याचे चिन्ह दिसत नाही म्हणून आज असा निर्णय घ्यावा की आज पासून आपली भुमिका ही जे जे आपल्या सोबत येतील त्या त्या सर्वांना सोबत घेऊन वेगळं ट्रस्ट स्थापन करुन त्या ट्रस्ट चे मुख्य नेतृत्व गेल्या ५ जानेवारी २०२३ च्या अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवर, कार्यकर्ते व तमाम बौद्ध समाजबांधवांनाच नव्हे तर मुंबई नाशिक पुणे अहिल्या नगर मंदिर समाज बांधवांना एकत्र करून मोर्चा चे नियोजन केले होते असे ते सर्वांच्या विश्वासाला पात्रं असं दिशादर्शक कृतिशील व्यक्तीमत्व म्हणजे च विजयराव वाकचौरे तथा भाऊ यांनीच करावं असा उपस्थितांमधुन सुर दिसून आला आणि त्याच दिशेने पुढील दिशा संदर्भात एक मत झाले!

या बैठकीसाठी विषेशत: मुंबई हुन सन्मा- प्रकाशजी लहीतकर साहेब, श्रीधरजी गायकवाड साहेब, भिमराव जगधने साहेब तालुक्यातुन अँड.सागर शिंदे ,रमेशराव शिरकांडे, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे,प्रकाश जगताप सर, दिनकरराव वैराट सर, डॉ. रविंद्र घोसाळे सर नवनाथ वैराळ सर, , बाळासाहेब साबळे सर सुरेशराव देठे, राजेंद्र गवांदे, राजेंद्र घायवट, रामनाथ पवार, विजय पवार, उत्तम पवार, प्रकाश हरी देठे, बाळासाहेब वैराट, सौ.अलका वाकचौरे मॅडम,सुमनताई जाधव मॅडम,रमेश वाकचौरे, किशोर रुपवते, सावळेराम गायकवाड, सुर्यकांत जगताप, शंकर संगारे ,
प्रकाश पराड, कवी-अशोकराव शिंदे, लक्ष्मण आव्हाड सर भगवान कोळगे, शिवाजी वाकचौरे, संतोष गायकवाड भगवान देठे , राजेंद्र आव्हाड अदी. असंख्य मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!
शेवटी उपस्थितांचे आभार मुंबई चे सन्मा-प्रकाशराव डोळस साहेब यांनी मानले,,,,




