ठाणे!ॶॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन कामगार सेनेच्या माध्यमातून निषेध,,

ठाणे – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब व राज्य अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशाने. रिपब्लिकन कामगार सेना ठाणे जिल्हा युनिट च्या वतीने सामाजिक न्याय समाज कल्याण मंत्र्याचा जाहीर धिक्कार जाहीर निषेध , जिल्हाधिकारी साहेब ठाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना रिपब्लिकन कामगार सेना ठाणे जिल्हा युनिट च्या वतीने वतीने निवेदन देण्यात आले की, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाठ यांनी विधानसभेत ॲट्रॉसिटी ॲक्ट तात्काळ अटक करू नये ,अगोदर चौकशी करावी असे वक्तव्या केले.अट्रोसिटी कायद्यात तात्काळ कारवाईचे आदेश असताना असे म्हटल्या मुळे अनुसूचित जाती – जमाती नागरिकांची भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने निषेधार्थ निवेदन देण्यात आले. याक्षणी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक विक्रम भाई खरे , ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजू दादा दोंदे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजदीप जगताप, कोकण प्रदेश प्रमुख संघटक आकाश भाई गायकवाड, उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष हनुमंतराव वाघमारे मुंब्रा शहराचे नेते प्रणव घोरपडे कल्याण शहराचे संघटक सुरज निर्भवणे कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते




