Uncategorized

बदलापूर! नगराध्यक्षांची दादागिरी सुरू,,पतिने बांधलेल्या अनाधिकृत इमारतीला रस्ता मिळण्यासाठी नंदनवन गार्डन मधिल झाडांची कत्तल,,,

 

कुळगाव बदलापूर नगरपालिका नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या पतिची दादागिरी सुरू असल्याचे समोर आले आहे


कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरात शासनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून नंदनवन गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे, या मध्ये गेले अनेक वर्षांपासून या गार्डनमध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे, त्या झाडांच्या जोपासणे साठी पालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, परिसरातील नागरीक तसेच लहान मुले विरंगुळा म्हणून याच नंदनवन गार्डनचा उपभोग घेत आहेत, गार्डन मध्ये सुशोभीकरण करताना अनेक झाडांची लागवड केली आहे, पर्यावरणाच्या अनुषंगाने याच झाडांमुळे गार्डन मध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनचा लाभ घेता येतो, परंतु याच गार्डनच्या पाठीमागे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे पती राजेंद्र घोरपडे यांनी पालिका प्रशासनाची दिशाभूल करुन किंवा पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून बाद झालेल्या डि पी रस्त्याचा आधार घेऊन अनाधिकृत ईमारतीचे बांधकाम केले आहे,

या बाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे, मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु आता पालिका प्रशासनावर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असून राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी रुचिता घोरपडे ह्या नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या असल्याने,आमचे आता कोणीच काहीही वाकडे करणार नाही असा समज करून याच अनाधिकृत इमारतीला रस्ता मिळण्यासाठी चक्क नंदनवन गार्डनचा बळी देण्याच काम राजेंद्र घोरपडे करत आहेत, या मुळे नगराध्यक्ष पदावर बसुन काहिच दिवस झाले असताना लगेचच लोकांसाठी लोकांच्या हक्काच्या तयार केलेल्या गार्डनची तोडफोड करुन दादागिरी करत झाडांची कत्तल करत असतील तर भविष्यात शहरातील विकासाची अवस्था काय असेल हे यांच्या याच कृत्यातून समोर आले आहे, पर्यावरण हा शहरातील विकासाचा प्रमुख मुद्दा असताना स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे बगीच्यांचाच बळी देत असतील तर शहरातील नागरीक यांच्या कडून कोणत्या विकासाची अपेक्षा करतील हा एक प्रक्षच आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!