महाराष्ट्र

बदलापूर! भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला झटका,, गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर असलेल वर्चस्व संपुष्टात,,,

नगरपालिका निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत

कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर शिवसेनेचे एकहाती असलेल वर्चस्व आता संपुष्टात आल आहे,कुळगाव बदलापूर नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नगरपालिकेवर शिवसेनेच्या माध्यमातून वामन म्हात्रे यांच वर्चस्व प्रस्थापित झाल होत, त्या वेळी शिवसेनेच्या मेहरबानीने भारतीय जनता पक्षाचे मोजकेच नगरसेवक निवडुन येत होते, परंतु आता बाजी पलटली आहे, नुकत्याच झालेल्या २०२५ च्या कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनाला जोरदार झटका देऊन आपल निर्विवाद वर्चस्व कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर प्रस्थापित केले आहे,


याला कारण ठरली विधानसभा निवडणुक,, महायुती असताना देखील शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात जाऊन आमदार किसन कथोरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता, या वेळी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, मोठ मोठे आरोप करण्यात आले, अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन देखील टीका केल्या गेल्या, या मुळे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराला आव्हान देण्यास सुरुवात केली, आणि हाच संघर्ष विकोपाला गेला, आणि फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली,

अशात पालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यांतीला संघर्ष हा निवडणुकीत प्रकर्षाने बघायला मिळाला, भारतीय जनता पक्षातुन अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते वामन म्हात्रे यांनी शिवसेनेमध्ये घेतले तर तोडीसतोड आमदार किसन कथोरे यांनी देखील मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील करून घेतले,आता संघर्ष हा राजकीय पक्षांमध्ये नसुन तो दोन राजकीय नेत्यांमध्ये असल्याचे पाहायला मिळत होते, दोन्ही पक्षांकडून प्रत्येक प्रभागात जोरदार मोर्चेबांधणी आणि शक्तिप्रदर्शन सुरू झाले होते,यातच आमदार किसन कथोरे यांनी आपली कसब पणाला लावून महायुती मधिल असलेले घटक पक्ष म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,हे दोन्ही पक्ष आपल्या बरोबर ठेवले होते,

त्या मुळे वामन म्हात्रे हे एकाकी पडले असल्याचे दिसून येत होते,
भारतीय जनता पक्षाने शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना वैयक्तिक लक्ष करत जोरदार विरोधी मोहीम सुरू केली, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी यांनी वामन म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली, भारतीय जनता पक्षाकडे बाजु मांडण्यासाठी आमदारांसह अनेक तरबेज कार्यकर्ते आहेत, परंतु शिवसेनेमध्ये एकटे वामन म्हात्रे सोडले तर पक्षाची किंवा विकासाची बाजु मांडण्यासाठी एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसल्याने संपूर्ण जबाबदारी ही वामन म्हात्रे यांनाच पार पाडावी लागत होती त्या मुळे वामन म्हात्रे यांची दमछाक होताना दिसत होती,त्यात वामन म्हात्रे यांनी आपल्याच घरातील सहा जणांना उमेदवारी दिली असल्याने, घराणेशाहीचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्षाला प्रचारासाठी आयते कुरण मिळाले होते,त्यातच आमदार किसन कथोरे यांनी रावळगाव कंपनीचा मुद्दा ऐरणीवर आणुन वामन म्हात्रे यांच्या विरोधात जोरदार प्रचार आघाडी सुरू केली होती,त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदलापूर मध्ये झालेली प्रचारसभा भाजपाच्या पथ्यावर पडली, वामन म्हात्रे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा आयोजित केली होती, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही,


दोन्ही पक्षांकडून आपल अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करणात आल्याचे दिसून आले, अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे उघडकीस येत होते, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पैसे वाटण्याच्या प्रकारात दोन महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते, शेवटच्या क्षणी एका मतदाराला दहा रुपये देण्यात आल्याचे बोलले जात आहे,

त्यातच अचानक २ डिसेंबर २०२५ रोजी काही प्रभागातील निवडणूक आयोगाने रद्द करुन काही निवडणूका १८ दिवस पुढे ढकलण्याने राजकीय पक्षांना मनस्ताप सहन करावा लागला होता,बंद खोलीत असलेल्या ईव्हीएम मशीनीं बाबत ऊलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, ईव्हीएम मशीनींच्या सुरक्षेसाठी तसेच एकुण संपूर्ण निवडणुकीत पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता,त्या काही किरकोळ घटना सोडल्या तर दिनांक २० डिसेंबर रोजी उर्वरित प्रभागातील निवडणूक सुध्दा सुरळीत पार पडली,


अखेर २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्षात मत मोजनी नंतर शिवसेनेला धक्कादायक असा निकाल बाहेर पडला, नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार रुचिता घोरपडे ह्या ७ हजार ६३४ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या त्यांना ६४ हजार ६०४ मते मिळाली आहेत,तर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विणा म्हात्रे ५६ हजार ९७० मते मिळाली आहेत, या मध्ये वामन म्हात्रे यांचा मुलगा वरुन म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यातच वामन म्हात्रे हे देखील अवघ्या तिस मतांनी निवडून आल्या मुळे ईज्जत काठावर वाचली असे म्हणायला हरकत नाही,

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सहभाग असुन नसल्यासारखा असल्याने त्यावर चर्चा करणे योग्य ठरणार नाही, बदलापूर नगरपालिका ही खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असताना देखील या निवडणुकीसाठी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी किमान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी देखील काहीही प्रयत्न न करता पुर्णपणे दुर्लक्ष केले होते,, खासदारांनी दाखवलेल्या निष्क्रियेते मुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ मिळाला आहे,

या मुळे भारतीय जनता पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशा थेट लढाईत नगरसेवकांची संख्या जरी सारखी असली तरी महत्वाच नगराध्यक्ष पद हे भाजपाकडे गेल्याने शिवसेना सत्तेपासून वंचित राहणार आहे ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!