महाराष्ट्र

*स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेले बाबा आढाव.श्रमिकांचा आधारवड कोसळला.!

( ०८ डिसेंबर २०२५) *पन्नालाल सुराणाजी गेले.महामानव भारतीय संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण ०६ डिसेंबर दिवसाचा अभिवादनाचा सूर्य मावळतो अन् नियतीचं आक्रीत समाजमाध्मातून आमच्या काळजावर आधळतं.! स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला बाबा, शतायुषी होणार असं वाटत असताना काळाच्या पडद्याआड.? आपल्याला लढायचं लढत राहू किती आत्मविश्वासाने “बाबा “बोलायचे.! जोहरान महमदानी न्यूयॉर्कचा महापौर झाल्यावर बाबांनी ऐकवलेलं वाक्य स्मरणात आहे.कष्टकरी लोकांनी,बायाबापड्यांनी निवडणूक हातात घेतली की, मस्तवाल राजसत्ता उलथून पडते.नव्या स्वातंत्र्यलढ्याची सुरवात होईल याचा जबरदस्त आत्मविश्वास बाबांना होता.प्रस्तापित रोषाची तमा बाबांनी कधीही बाळगली नाही.सामाजिक न्यायाचा अग्रणी, प्रसंगी उपेक्षितांच्या कष्टकरी , असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे श्रमिकांचा चेहरा म्हणून बनून राहिलेले फेरीवाले ,कचरा वेचणारे रिक्षावाले, बांधकाम गवंडी, हमालपंचायत ,एक गाव एक पाणवठा, कष्टकऱ्यांच्या हक्काचं आयुष्य जगणारा, “शिव- शाहू- फुले -आंबेडकर” यांचा वैचारिक वारसा अभ्यासक म्हणून पुरोगामी चेहरा कष्टकऱ्यांच्या हक्कांचा आधारवड कोसळला..! याबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स भारत देश सन्मानीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार यांच्याशी वार्ताही झाली होती . आपण कष्टाची भाकर , एक गाव एक पाणवठ्याचे जनक बाबा आढाव यांना सहस्त्रकातील महापुरुष अर्थात सहस्त्रकातील जीवित महापुरुष म्हणून आपल्या जीवनआधार फौंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊ या. त्यांनी आमची संकल्पना मान्यही केली होती. मागे आम्ही महाराष्ट्रभूषण “अण्णा हजारे” यांना जीवन आधार फाउंडेशनच्या वतीने राळेगणसिद्धी येथे जाऊन त्यांना जिवित महापुरुष पुरस्काराने गौरवण्यात आलं होते.आम्ही शब्दबद्ध केलेले सन्मानगौरव , सन्मानपत्र आण्णांना भावले होते.दोन‌ मिनीटे त्यांच्या हातानी काळजावर ठेवले होते.अन् उद्गारलेही राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचा अभंग, मज काय थोरवी पामरासी .. पायातील वहाण पायी ..! सेवा परमो धर्म.. सामाजिक कार्याचा भाग म्हणून बाबांना प्रथम भेटून पुरस्कार द्यायची तीव्र इच्छा होती.पऱतू नियतीचा खेळ काही उमजणा, बाबा,आज मितीला शखंत मात्र सारखी सतावते आहे.पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर बाबा आढावांची श्रमिकांष्टाचीभत्यांचं नाव असलेला बोर्ड पाहिला . पंचतारांकित हॉटेलमध्ये न जाता मातीतला ,पाय जमीनीवर ठेवून चालणारा कार्यकर्ता म्हणून मी, झुणका भाकर खाल्ली.! फोटोही काढला. कारण फोटो बोलत राहतात हे मात्र नक्की.स्वातंत्र्यांचा सूर्य पाहिलेले “बाबा आढाव ” आपल्यात नाहीत.पाणवठा उघडा पडू नये.”बाबा” भावपूर्ण अभिवादन.
साभार
*समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन, सोशल मीडिया ठाणे जिल्हा!+९३२४३६६७०९*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!