“संविधान गौरव दन” भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे उत्साहात संपन्न

*जिल्हा परिषद शाळा कांदळी, केंद्र कोशिंबी, तालुका भिवंडी येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले*
*संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधान प्रचार रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक सहभागी झाले होते सहभागी झाले होते

*संविधानाचे शिल्पकार महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळा समिती अध्यक्ष प्रगती दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले* *तसेच संविधान प्रतिला पुष्प अर्पण करण्यात आले

सर्व विद्यार्थी व पालक यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
*शिक्षक अशोक गायकवाड यांनी भारतीय संविधान दिन या विषयावर प्रबोधन पर मार्गदर्शन केले*
*विद्यार्थ्यांनी संविधान विषयी भाषणे सादर केली. तसेच निबंध लेखन केले
.
सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट बिस्कीट व लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला
ग्रामपंचायत अधिकारी किशोर गोडसे, सदस्य अनंता जाधव, धनश्री बेलवले. प्रकाश जाधव शाळा समिती अध्यक्ष प्रगती दळवी , सदस्य आरती पाटील, साक्षी जाधव, अंगणवाडी ताई कविता जाधव, गोदावरी जाधव,
मुख्याध्यापिका जयश्री पष्टे, सहशिक्षक अशोक गायकवाड विद्यार्थी व पालक उपस्थित होते,”




