शैक्षणीक

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा…!

. महाराष्ट्र राज्यातील पाच लाख मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज, कर्मचाऱयांचीं सरळसेवा भरती, पदोन्नती व शासन सेवेत होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, मागील 45 वर्षापासून शासन स्तरावर सनदशीर मार्गाने बैठका घेऊन न्याय मिळवून देणारे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी दिन म्हणून साजरा केला जातो.

या वाढदिवसानिमित्त समाजातील आदिवासी,वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तसेच गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य तसेच महिलांना साडी चोळी देऊन करून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या नेतृत्वात,दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा नेवरे केंद्र अघई येथील शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात आनंददायी शिक्षण प्राप्त होण्यासाठी एक स्मार्ट टीव्ही तसेच दहा खुर्च्या व विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता


. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रामचंद्र विशे साहेब उपस्थित होते आपल्या मनोगतात त्यांनी काष्ट्राईब शिक्षक संघटना शिक्षक प्रश्न जेवढ्या ताकतीने सोडवते तेवढ्याच तळमळीने गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थी व समाज यासाठी देखील कार्य करते याबद्दल संघटनेचे कौतुक केले
. गावाच्या प्रथम नागरिक उपसरपंच सौ.निशिगंधा दिपक बोंबे मॅडम यांनी देखील यावेळी आमच्या जिल्हा परिषद शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच महिलांना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची महती कथन केली


. यावेळी कार्यक्रमात विजयकुमार जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष,संतोष गाढे कोकण अध्यक्ष, अशोक गायकवाड राज्य कार्यकारणी सदस्य ,किशोर भोईर सेवानिवृत्त युनिट अध्यक्ष, मनोज गोंधळी शहापूर तालुका अध्यक्ष, जगदीश गायकवाड शहापूर तालुका सचिव,दत्तू पालवे संघटक शहापूर, यांनी मनोगता द्वारे विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरणारच,तसेच शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करून आपले जीवन घडवा असा बहुमूल्य संदेश दिला
. कार्यक्रमासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाळकृष्ण बांगर सर, श्री सुरेश निपुर्ते शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, राजेश मुकणे शिक्षण प्रेमी, अंगणवाडी सेविका, पालक,ग्रामस्थ व मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.

सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय मार्मिक भाषेत सूत्रसंचालन पिवळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रभाकर जाधव यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री.संजय शेटे सर यांनी मानले
. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री.अशोक टकले सर, शिक्षिका सौ. प्रीती पवार मॅडम यांनी मेहनत घेतली
. काष्ट्राईब शिक्षक संघटनेने आयोजित केलेला या समाज उपयोगी उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!