राजनीति

बदलापूर!””दुश्मन का दुश्मन अपणा दोस्त “वामन म्हात्रे यांच्या युक्तीचा पालिका निवडणुकीत होईल का फायदा?,,,

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली असल्याने शहरामध्ये चर्चेला उधाण आले आहे, पालिका निवडणुकीत महायुतीचे पक्ष असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मध्ये आता युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, विधानसभा निवडणुकी नंतर भाजपा आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्ये विकासकामांवरुन, तसेच कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका ठेवला असल्याने मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली आहे, त्यातच सत्तासंघर्षाच्या वादामुळे बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्या मधला संघर्ष देखील टोकाला गेला आहे,दोन्ही पक्षांकडून कडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या मध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या बेबनावाचा फायदा घेण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी रणनिती आखली असून “दुश्मन का दुश्मन अपणा दोस्त “या युक्ती प्रमाणे दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांनी केलेल्या विकास कामांचे भरभरून कौतुक केले आहे, या मुळे आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये देखील दोन गट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे,आता कपिल पाटील हे महायुती मधुन बाहेर पडलेल्या शिवसेनला मदत करणार की महायुतीच्या बाजुने ठाम भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!