Uncategorized

अर्पण एक दिवाळी भेट कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कांदळी* येथे उत्साहात संपन्न

रोटरी क्लब ऑफ क‌‌ल्याण टायगर्स आणि वरद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

’आज रविवार दिनांक १२/१०/२०२५ रोजी कांदळी शाळेत आगळीवेगळी दिवाळी विद्यार्थी व पालकांनी साजरी केली. *विद्यार्थ्यांच्या आईला एक साडी , मिठाई, संपूर्ण दिवाळी पदार्थ साहित्य किट (गव्हाचे पीठ पाच किलो, मैदा एक किलो, रवा एक किलो, बेसन एक किलो, एक किलो तेल, घी एक किलो, हळदी पावडर, मिरची पावडर 500 ग्रॅम, चिवडा, मिठाई, एक साडी, एक शर्ट पीस, एक टॉवेल, नोटबुक, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, डायरी)अर्पण संस्थेच्या वतीने देण्यात आली* *तसेच फटाके वाजवून दिवाळी पूर्व दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली

  • यावेळी प्रशांत भोसले सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
    रोटरी क्लब ऑफ क‌‌ल्याण टायगर्स चे अध्यक्ष भुषण कोठावणे, सचिव दक्षता रानडे, कोषाध्यक्ष विनय हेडाऊ ‌व  संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद शाळा  कांदळीचे सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी सर्वांचे शाल व गुलाब पुष्प देऊन यथोचित स्वागत केले.
    सदर कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!