पी. एम. श्री जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळा उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्काराने सन्मानित .

गुरूवार दिनांक 9/10/2025 रोजी ओसवाल विद्यालय भिवंडी येथे आदर्श शिक्षक गुणगौरव व आदर्श शाळा गुणगौरव समारंभ भिवंडी लोकसभा खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदर समारंभात PM SHRI जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक अशोक गायकवाड व सहशिक्षिका दिलशाद शेख मॅडम यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आदरणीय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे हस्ते शाल,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी गोविंद खामकर, गटशिक्षण अधिकारी संजय असवले,योजना प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे, कास्ट्राईब शिक्षक संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष विजय कुमार जाधव, कोकण अध्यक्ष संतोष गाढेसर व विविध संघटनांचे पदाधिकारी,प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

PM SHIRI जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळा संपूर्ण भिवंडी तालुक्यातील एकमेव पी.श्री शाळा असून तिथे सुंदर परसबाग व किचन गार्डन, सुसज्ज सुंदर ईमारत, गांडूळखत, स्वच्छता पखवाडा,एक पेड माॅ के नाम, स्वच्छ सुंदर शाळा, निपूण महाराष्ट्र, दिशा प्रोजेक्ट, ईको कल्ब, 100 पटनोंदणी व उपस्थिती,गुणवत्तापूर्ण शिक्षण व उपक्रम. महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजरे करणे, सहशालेय विविध उपक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक गायकवाड, सहशिक्षका दिलशाद शेख मॅडम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



