ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आंमली पदार्थ कायद्या अंतर्गत आठ गुन्ह्यातील सुमारे १२८ किलो गांजा नष्ट,,,

ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री डॉ,डि एस स्वामी तसेच अपर पोलीस अधीक्षक मा, श्री अनमोल मित्तल यांनी ठाणे ग्रामीण पोलिस जिल्ह्यातील, अमली पदार्थ कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याच्या बाबत, विशेष मोहीम राबवुन, जास्तीत जास्त गुन्ह्यातील अमली पदार्थ नाश करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे,
त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तथा नोडल अधिकारी अमली पदार्थ विरोधी पथक, यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्ष, ठाणे ग्रामीण या ठिकाणी जिल्ह्यातील विविध अमली पदार्थ कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त अमली पदार्थ मुद्देमालाचा आढावा घेण्यात आला,

संपूर्ण बाबींची पूर्तता झाल्यानंतर अशा आठ गुन्ह्यातील एकुण १२८ किलो ५९७ ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्यासाठी, ठाणे ग्रामीण मुद्देमाल नाश समिती यांच्या कडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता, या वेळी समिती कडून प्रस्तुत प्रस्तावाची पडताळणी करून,अमली पदार्थ मुद्देमाल नाश करणे करिता प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून, शासकीय पंच व रासायनिक विश्लेषक यांचे ऊपस्थितीत, शासनाने प्राधिकृत केलेल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा एम आय डी सी नवी मुंबई येथे, ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थ कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्या पैकी आठ गुन्ह्यातील एकुण १२८ किलो ५९७ ग्रॅम, वजनाचा गांजा अमली पदार्थ मुद्देमाल संपूर्ण प्रक्रियेचा पंचनामा व्हिडिओग्राफी व फोटो ग्राफी करण्यात आले, अशा सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन नाश करण्यात आला,

सदरची कारवाई मा, श्री डॉ डि एस स्वामी पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तथा मुद्देमाल नाश समिती अध्यक्ष, ठाणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक, श्री अनमोल मित्तल, ठाणे ग्रामीण तथा सदस्य मुद्देमाल नाश समिती सदस्य, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दादासो एडके, पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण, पोलिस उपनिरीक्षक/दिपेश किणी, पोलिस उपनिरीक्षक/दिलिप जगताप,पोहवा/विकास ताम्हाने,पोहवा/२७०९ सदानंद गोसावी,पोना/४९ विनोद दिघळकर,पोशि /३६८२ जयवंत कांडलेकर,पोशि/१४६७ योगेश परदेशी,पोशि/४४९१ रोहित रोकडे य पथकाने कौशल्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी बजावली,




