Uncategorized

बदलापूर! देशातील अग्रगण्य संस्था “राजनिती की पाठशाला”च्या अध्यक्ष पदी एकनाथ शेलार यांची नियुक्ती,,

एकनाथ शेलार हे शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश सहसचिव

बदलापूर शहराला लागूनच असलेल्या वांगणी शहरातील प्रसिद्ध व्यक्ती महत्व एकनाथ शेलार यांची “राजनिती की पाठशाला”या संस्थेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे,

एकनाथ शेलार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे प्रदेश सहसचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत, “राजनिती की पाठशाला” हि संस्था संपूर्ण देशभरात कार्यरत असुन, राजकारणापासून दूर असलेल्या होतकरू तरुणांना तसेच ईतर स्वाभिमानी नागरिकांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी मार्गदर्शन करत असते, जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी तसेच विद्यार्थ्यांनी राजकारणात येऊन देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची प्रेरणा या संस्थेच्या माध्यमातून दिली जाते, एकनाथ शेलार यांची वाढती लोकप्रियता तसेच मोठा जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांना या संस्थेच्या अध्यक्ष पदी विराजमान केले असल्याचे समजते, संस्थेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबाबत एकनाथ शेलार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!