बदलापूर शहरातील नोंदणीकृत देवस्थाने उत्सव मंडळांवर सामाजिक प्रतिष्ठित पदाधिकारी यांची नेमनुक करा-कुळगाव बदलापूर विकास समितीची मागणी,,

कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील नोंदणीकृत देवस्थाने, उत्सव मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शहरातील सामाजिक आणि प्रतिष्ठित पदाधिकारी यांची नेमनुक करण्याची मागणी कुळगाव बदलापूर विकास समितीच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष देवेंद्र ऊर्फ पपु काळे यांनी केली आहे, शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी मिळणाऱ्या या संस्थांच्या निधीचा योग्य विनिओग व्हावा, यासाठी विकास समितीने केलेल्या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे असे देवेंद्र काळे यांनी म्हटले आहे,
. शासकीय निधी प्राप्त झालेल्या संस्थांवर आता नगरपालिकेतर्फे पदसिद्ध मुख्याधिकारी आणि दोन अधिकारी-कर्मचारी यांची देखरेख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नेमणुकींमुळे जनतेच्या कररूपी पैशातून मिळालेल्या निधीचा गैरवापर रोखण्यास मदत होईल आणि सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक होतील
: देखरेख समितीमध्ये शहरातील प्रतिष्ठित आणि अनुभवी नागरिक व समाजसेवकांचा समावेश केल्याने, स्थानिक संस्थांना योग्य मार्गदर्शन मिळेल , या संपूर्ण प्रक्रियेबाबत १ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन देवेंद्र काळे यांनी केली आहे , यामुळे शहराच्या विकासाला एक नवी आणि शिस्तबद्ध दिशा मिळणार आहे.हा निर्णय कुळगाव बदलापूर शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि जनतेच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.असे देवेंद्र काळे यांनी म्हटले आहे


