लोकल न्यूज़

बदलापूर पालिकेचा अनोखा ‘चंद्रयान’ पॅटर्न, रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांत रस्ते? शोधणे कठीण! महाविकास आघाडी कडून चक्क खड्ड्यांचा तिसरा वाढदिवस साजरा,,,,

बदलापूर:बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था सध्या इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना ‘चंद्रभूमीवर’ फिरत असल्याचा भास होत आहे. शास्त्रज्ञांनी चंद्रावरील खड्डे शोधण्यासाठी लाखो किलोमीटर प्रवास केला, पण बदलापूरकरांना तेच खड्डे अनुभवण्यासाठी फक्त घराबाहेर पडण्याची गरज आहे, असा टोमणा आता त्रस्त नागरिक पालिकेला मारत आहेत.’खड्डेमुक्त’ बदलापूरच्या घोषणा हवेत विरल्यादरवर्षी पालिकेकडून रस्ते दुरुस्ती आणि पॅचवर्कच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद कागदावर दाखवली जाते. मात्र, पहिल्याच पावसात हा कोट्यवधींचा सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता वाहून जातो आणि उरतात ते फक्त जीवघेणे खड्डे. कात्रप, बेलवली, शिरगाव असो वा बदलापूर पूर्व-पश्चिमेला जोडणारे मुख्य रस्ते, प्रत्येक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

या खड्ड्यांमुळे रोज शेकडो वाहनचालकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत आहेत.रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची का होतात?” याचे उत्तर पालिकेकडे नाही. नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा दरवर्षी त्याच त्याच खड्ड्यांमध्ये मुरतो आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या या क ‘अर्थपूर्ण’ अभद्र युतीमुळे बदलापूरच्या रस्त्यांची ही दुर्दशा झाली आहे, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी जे साहित्य वापरले जाते, ते इतके हलक्या दर्जाचे असते की दोन दिवसांत त्याची पुन्हा खडी होते. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार घसरून पडणे ही तर आता नित्याचीच बाब झाली आहे. पालिकेचे सुस्त इंजिनिअर्स आणि प्रशासन नक्की कोणत्या मोठ्या अपघाताची किंवा बलिदानाची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता बदलापूरचे नागरिक विचारत आहेत. सोशल मीडिया पोर्टलवर सध्या बदलापूर पालिकेच्या या निष्काळजीपणा विरोधात नुकताच महाविकास आघाडी कडून रस्त्यावरील खड्ड्यांचा चक्क केक कापून वाढदिवस साजरा केला आणि प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली आहे.तरी देखील निर्लज्ज प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली गेली नाही,हा लोकप्रतिनिधींनी कडून नागरिकांचा केलेला विश्वासघात आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!