Uncategorized
स्व. सौरभ भाई प्रतिष्ठान कांदळी तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप,,

दिनांक दिनांक 1 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद कांदळी, भिवंडी येथे स्व. सौरभ प्रविण मानकर यांच्या स्मरणार्थ ,स्व. सौरभ भाई प्रतिष्ठान कांदळी तर्फे शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन वह्या, लेखन साहित्य किट,(पेन पेन्सिल खोडरबर शॉपनर पट्टी)व खाऊ म्हणून समोसे वाटत करण्यात आले.

तसेच आयुष्यमान अशोक गायकवाड सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा कांदळी, राज्य कार्यकारिणी सदस्य कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करून व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी स्व. सौरभ भाई प्रतिष्ठानचे नयन दळवी,रवी चंदे, संकेत जाधव,प्रित दळवी, ऋतिक दळवी, वरिष्ठ शिक्षिका जयश्री पष्टे, शिक्षक अशोक गायकवाड, अंगणवाडी सेविका कविता जाधव, मदतनीस गोदावरीताई व विद्यार्थी उपस्थित होते.




