Uncategorized

दादा कोंडके यांच्या गाण्यांची आठवण; ‘हिल पोरी हिला’ ची सोशल मीडियावर धूम,,

प्रतिनिधी रुतिकेश रोकडे

मराठी मनोरंजन विश्वात सध्या गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचे ‘हिल पोरी हिला’ हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे.

गाण्यातील आकर्षक संगीत, दमदार नृत्य आणि दोन्ही कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांकडून या गाण्याला मोठी पसंती मिळत आहे.
विशेष म्हणजे, या गाण्याची शैली आणि शब्दरचना पाहता अनेक नेटकऱ्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या गाण्यांची आठवण होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. हलक्याफुलक्या विनोदासह सादर केलेल्या या गाण्याने तरुणांसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गाण्यावर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्यावरील नृत्याचे व्हिडिओ शेअर केले असून, त्यामुळे ‘हिल पोरी हिला’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
गौतमी पाटीलच्या नृत्याची खास शैली आणि भाऊ कदम यांच्या विनोदी अंदाजामुळे हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असून, मराठी संगीतप्रेमींकडून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!