महाराष्ट्र

ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे ग्रामीण पोलीस महाराष्ट्रात अव्वल; माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव

​ठाणे/मुंबई:
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आयोजित ‘१५० दिवस ई-गव्हर्नन्स’ या विशेष कार्यक्रमात ठाणे ग्रामीण पोलीस दलाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशाबद्दल आज माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) मा.डॉ.डी एस स्वामी यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
​स्पर्धेचे स्वरूप आणि यश:
राज्यातील सर्व शासकीय विभागांच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘आपले सरकार’ योजना, ई-ऑफिस प्रणाली, विभागाचे डॅशबोर्ड आणि वेबसाईट या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. ठाणे ग्रामीण पोलिसांनी २०० पैकी १६८.५ गुण मिळवून राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये प्रथम स्थान मिळवले.
​तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर:
ठाणे ग्रामीण पोलिसांनी या स्पर्धेत दोन अत्यंत महत्त्वाचे आणि आधुनिक प्रकल्प सादर केले, ज्यांची राज्य स्तरावर विशेष दखल घेण्यात आली:
• ​ब्लॉकचेन आधारित मुद्देमाल व्यवस्थापन: जप्त केलेल्या मालाची (मु मुद्देमाल) नोंद सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर.
• ​AI/NLP आधारित गुन्हे नकाशा: गुन्ह्यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ,कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नकाशा प्रणाली.
• आधुनिक डॅशबोर्ड डिजिटल बँड व इतर अभिनव उपक्रम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!