बदलापुरातील ‘बोगस’ रुग्णालयांची मुजोरी; प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून सह्याद्री आणि धनलक्ष्मी हॉस्पिटल सुरूच!

बदलापूर: शासनाच्या आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कडक आदेशांना केराची टोपली दाखवत, बदलापूर पश्चिम परिसरातील सह्याद्री आणि धनलक्ष्मी ही दोन रुग्णालये अजूनही बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रुग्णालयांना तातडीने बंद करण्याचे आदेश देऊनही त्यांचे कामकाज छुप्या पद्धतीने सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी २३ जुलै २०२५ रोजी एक महत्त्वाचा आदेश जारी करून बदलापूर येथील सह्याद्री हॉस्पिटल आणि धनलक्ष्मी हॉस्पिटल तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील बदलापूर शहरामध्ये येऊन हे दोन्ही रुग्णालय तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत,त्रुटी, नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली होती. काही प्रकरणांमध्ये या रुग्णालयांना ‘बोगस’ ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले गेले होते
प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक:
ताज्या माहितीनुसार, हे आदेश लागू असतानाही ही रुग्णालये अद्याप कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या पाहणीत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दिवे सुरू असल्याचे आणि परिचारिका (Nurse) आतमध्ये जाताना दिसून आल्या आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्यावर मात्र घाईघाईने दिवे बंद करून रुग्णालय बंद असल्याचे भासवण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सील करण्याचे आदेश देऊनही ही रुग्णालये सुरू राहणे, हे प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे
महत्वाचे मुद्दे:
आदेशांचे उल्लंघन: जुलै २०२५ पासून ही रुग्णालये बंद करण्याचे आदेश असतानाही २०२६ मध्येही ती छुप्या पद्धतीने सुरू आहेत.
रुग्णांची सुरक्षा धोक्यात: या रुग्णालयांमध्ये पुरेशा परवानग्या नसणे आणि अननुभवी डॉक्टरांकडून उपचार होणे अशा गंभीर तक्रारी आहेत.
बोगस डॉक्टरांची साखळी: काही अहवालांनुसार, यातील डॉक्टरांकडे आवश्यक पदव्या नसल्याचेही समोर आले आहे.
कारवाईची मागणी: बदलापूरकरांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रुग्णालयांवर तातडीने कठोर कारवाई करून ती कायमस्वरूपी सील करण्
प्रशासकिय भुमिका:
जिल्हा शल्यचिकित्सकांनी यापूर्वीच यावर कारवाईचे संकेत दिले असले तरी, प्रत्यक्षात ही रुग्णालये सुरू असल्याने बदलापुरात चिंतेचे वातावरण आहे. राज्य सरकारने नुकतीच ५,००० हून अधिक खाजगी रुग्णालयांना नोटिसा बजावल्या असताना, बदलापुरातील या दोन रुग्णालयांची मुजोरी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.


