Uncategorized

मुंबई! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख समीर वर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत “फ्रि मेगा मेडिकल कॅम्प आणि रक्तदान”शिबिराचे आयोजन


बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी न्यू स्टील बफीग असोसिएशन आणि सोशल सिक्युरिटी फाउंडेशन तर्फे वालीव येथे दरवर्षी प्रमाणे “फ्री मेगा मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख समीर वर्तक यांचा  सन्मानचिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


दरवर्षी आरोग्य शिबिरा मार्फत असंख्य कामगार व वालीव परिसरितील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पूरविण्याचे कार्य या संस्थेचे अध्यक्ष शरद कदम महासचिव निजाम खान, आणि कय्युम भाई व संस्थेचे पदाधिकारी, सहकारी व मित्रपरिवार करीत असतात.
या शिबिरास शिल्पा स्टील समूहाचे अनिल शाह अध्यक्ष स्थानी होते तर बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे विशेष अतिथी लाभले. तसेच स्थानिक नगरसेविका लता कांबळे व समाजसेवक रणधीर कांबळे, लीलाधर भाई, मोहन भाई आणि माझ्यासोबत काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे डेरीक फुर्टाडो, अरनॉल्ड कर्व्हालो, तारिक खान, संकेत वसईकर, राहुल देवकर, सादिक खान व शमशाद खान तसेच अनेक मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!