बदलापूर! “नगराध्यक्ष सभागृहात आल्यानंतर सर्व सदस्यांनी ऊभे राहणे हे लोकशाही परंपरेचा व त्या सर्वोच्च पदाचा आदर दर्शवण्याचे प्रतिक मानले जाते “

कुळगाव बदलापूर नगरपालिका सभागृहात सुरू होणाऱ्या सभेच्या कामकाजा आधीच भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांच्या मध्ये नगराध्यक्ष यांच्या मानसन्मानावरुन वाद निर्माण झाला,, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे ह्या सभागृहात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी हे त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले, परंतु शिवसेना शहरप्रमुख वामन नगरसेवक वामन म्हात्रे आणि शिवसेनेचे इतर नगरसेवक हे खालीच बसुन राहिल्याने, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले,,” तुम्हाला या खुर्चीचा मान ठेवायचा नसेल तर तुम्ही सभागृहात आला नाही तरी चालेल “अशा शब्दात नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना बजावले,यावर नगरसेवक वामन म्हात्रे हे चांगलेच संतापले आणि नगराध्यक्ष सभागृहात आल्यानंतर उभे राहणे अशा प्रकारचा कोणताही कायदा नसल्याचे सांगत ऊलट अर्थि विधानसभेचा दाखला देत नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनाच सभागृहातील नियमाचा अभ्यास करून या असा सल्ला दिला, यावर सभागृहात बऱ्याच वेळ दोन्ही कडून गदारोळ झाला असल्याचे पाहायला मिळाले,
खर पाहता नगराध्यक्ष हे नगरपालिका नगरपरिषदेचे लोकनियुक्त प्रमुख आणि सभागृहाचे अध्यक्ष असतात, शिष्टाचारानुसार त्यांचा सन्मान राखणे हे सर्वच लोकप्रतिनिधी यांच कर्तव्यच आहे, नगराध्यक्ष जेव्हा सभागृहात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या पदाचा सन्मान राखण्यासाठी नगरसेवकांनी ऊभे राहण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते, हे लोकशाही परंपरेचा त्या सर्वोच्च पदाचा आदर दर्शवण्याचे प्रतिक मानले जाते,
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये नगराध्यक्ष यांच्या कार्याचा आणि अधिकाराचा उल्लेख आहे, परंतु नगरसेवकांसाठी ऊभे राहणे हा सक्तिचा कायदेशीर नियम नसून तो प्रामुख्याने शिष्टाचाराचा भाग आहे,
लोकसभेचे अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष सभापती हे सभागृहात आल्यानंतर सर्व सदस्य ऊभे राहून त्यांचा सन्मान करतात,त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये देखील ही परंपरा पाळली जाणे गरजेचे आहे,




