महाराष्ट्र

शासनाच्या दिडशे दिवस कार्यक्रमात, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय ठरले, “सर्वोत्तम पोलिस अधीक्षक कार्यालय “

"ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात प्रथम "

मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी या उद्देशाने , महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात,०७ प्रमाणे दिडशे दिवसांचा उपक्रम सुरू करण्यात आला होता, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार,मा डि डि एस स्वामी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण कार्यालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले,
१)कार्यालयाची अधिकृत वेबसाईट २)आपले सरकार प्रणालीचा वापर ३)ई_ऑफिस प्रणाली ४) कार्यालयीन डॅशबोर्ड ५) व्हॉट्सॲप चॅटबॉट वापर ६) शासकीय कामकाजात AI आणि Blockchain तंत्रज्ञानाचा वापर ७)GIS तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर ,
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वरील सर्व ०७ निकष कार्यप्रणालीचा योग्यप्रकारे वापर करून शासकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक तसेच नागरिकांना सहजपणे वापर करता यावा त्यात सुधारणा करून उत्कृष्ट कामगिरी केली असून, भारतीय गुणवत्ता परिषद (Quality council of India ) तर्फे महाराष्ट्र राज्यातील ३६ पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मुल्यमापन करून त्यात पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी २०० पैकी १६८•२५ गुण मिळवून, महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकवत सर्वोत्तम पोलिस अधीक्षक कार्यालयाचा बहुमान मिळवला आहे,
या व्यतिरिक्त सर्व सामान्य नागरिकांना जनजागृती साठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत एक डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली आहे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोक सहभागातून “एक सि सि टिव्ही आपल्या सुरक्षेसाठी “या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे,
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मा, श्री डि डि एस स्वामी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच श्री अनमोल मित्तल,अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दानिश मन्सूरी, आसिफ बेग, पोलिस उपनिरीक्षक संजय कदम, निरंजन पाटील, पोलिस हवालदार मयुर कोळी,मोसिन खान, पोलिस शिपाई जयवंत कांडलकर यांनी कामकाज करुन उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!