विकासासाठी अनुभवाचे मार्गदर्शन महत्वाचे असते,ते घेण्याची तयारी असणारे नेतृत्वच पुढे जात असते _राम पातकर

बदलापूर/वांगणी शहरातील सुकन्या भारतीय जनता पक्षाच्या.अंबरनाथ शहर नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी विश्वजित करंजुले पाटील यांनी नुकतीच भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची भेट घेतली.या वेळी सुमारे ३ तास अंबरनाथ शहराच्या स्वच्छता, स्ट्रीट लाईट, शिक्षण, रेल्वे, बस सेवा, पाणीपुरवठा, रस्ते आदी सर्वांगीण विकासात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली. अशी सकारात्मक देवाणघेवाण निश्चितच अंबरनाथ शहराचे नाव उज्वल करेल.असा विश्वास राम पातकर यांनी व्यक्त केला,
याच अनुषंगाने, त्या काळातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री तसेच आपल्या आणि शेजारच्या जिल्ह्यातील आमदार, खासदार व मंत्री नेहमीच मार्गदर्शन घेत असतात तेजस्विनी यांनीही त्याच परंपरेला पुढे नेले आहे,याचा आनंद आहे. माझे आशीर्वाद नेहमीच तिच्या पाठीशी राहतील.असे मत राम पातकर यांनी व्यक्त केले आहे,
या भेटीतून पुन्हा एकदा आठवण झाली की, विकासासाठी अनुभवाचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते आणि ते घेण्याची तयारी असणारेच खरे नेतृत्व पुढे जाते.असे मत राम पातकर यांनी व्यक्त केले आहे,




