देश
आज १८ डिसेंबर,देशाती अल्पसंख्याक समुदायाचा हक्काचा दिवस, “अल्पसंख्याक हक्क दिन”

- भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन हा १८ डिसेंबर रोजी संपुर्ण भारतभर साजरा केला जातो, अल्पसंख्याक समुदायाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो,भारत देशातील मुस्लिम,शिख, ख्रिश्चन, बौद्ध,पारशी, जैन,हा समाज भारत देशात अल्पसंख्याक म्हणून मानला जातो, या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम तसेच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, राज्य घटनेच्या कायद्या नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला पाहिजे,मग ती कोणतीही जात, भाषा,समुदाय किंवा धर्म असो, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणाची तरतूद करुन ठेवली आहे,
देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या एक स्वतंत्र अयोग स्थापन करण्यासाठी सन १९७८ साली केंद्रीय गृहमंत्रालयाने एक ठराव पारित केला आहे, अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी संविधानात अनेक कायदे केले आहेत,असे असताना देखील अल्पसंख्याक समुदाय बाबत कायमच भेदभाव केला जात असल्याने, तसेच अल्पसंख्याक समुदायाला असुरक्षित भावना निर्माण होत असल्याने, हे अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देण्यासाठी “राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग “स्थापन करण्यात आला आहे, या बाबत १९९३ ची अधिसूचना काढली गेली आहे,जे लोक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत,ज्यांची लोकसंख्या कमी आहे,ज्यांचा धर्म, परंपरा भाषा, सर्व सामान्य समाजातील लोकांपेक्षा वेगळी आहे,ते लोक अल्पसंख्याक म्हणून गणले जातात, परंतु शेजारच्या देशातील अल्पसंख्याक निर्वासितांना नागरीकत्व देण्याच्या कायद्याला विरोध करत, सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांची व्याख्या स्पष्ट करत निकाल देताना म्हटले आहे की, धर्माला मर्यादा नसुन, धर्माकडे, राज्याच्या दृष्टीने न पाहता, संपूर्ण भारतीय पातळीवर पाहिले पाहिजे, भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विन कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून जम्मू काश्मीर आणि ईशान्य कडील एकुण ८ राज्यांमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या कमी असल्याचे सांगितले होते, त्या मुळे त्यांना देखील अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आले आहे, या मुळे त्यांना त्या ठिकाणी सरकारी सुविधा आणि हक्क मिळु शकले आहेत,
अल्पसंख्याक हे धर्म, भाषा, राष्टित्व, किंवा जात या वर आधारीत असुन अल्पसंख्याक समुदायाची संस्कृती आणि धर्म तसेच त्यांच्या ईतर अधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने,१९२ साली, या दिवसासाठी १८ डिसेंबर ही तारीख अल्पसंख्याक दिन म्हणून जाहीर केली आहे,
त्या वेळी संयुक्त राष्ट्राने उचलले हे मोठे पाऊल होते, विशेष म्हणजे भारताच्या दृष्टीने हे लक्षात घेऊन भारतात अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे,हा आयोग अल्पसंख्याक समुदायाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा आयोग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे,




