महाराष्ट्र

बदलापूर! आंबरनाथ तालुक्यातील जांभीळघर राहटोली परिसरातील अष्टांग योग हॉल मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत “आमदार कृषी पुरस्कार सोहळा २०२५”चे आयोजन

अंबरनाथ तालुक्यातील जांभिळघर राहटोली परिसरातील अष्टांग योग हॉल मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत”आमदार कृषी पुरस्कार सोहळा २०२५ “चे आयोजन करण्यात आले होते, भारतीय जनता किसान मोर्चाचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष अमर भोपी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत भोपी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,


निसर्गातील बदल आणि परतीच्या पावसामुळे, आंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे,ऐन पिक कापणीच्या वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,
याच आसमानी संकटाची दखल घेऊन तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, भारतीय जनता किसान मोर्चा आंबरनाथ तालुका अध्यक्ष अमर भोपी यांच्या माध्यमातून “आमदार कृषी पुरस्कार २०२५”या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला,


कार्यक्रमात भात शेती फलोत्पादन, सेंद्रीय शेती, कृषी तंत्रज्ञान,वाणबियाणे संवर्धन, भाजीपाला,दुध उत्पादन, कृषी पर्यटन,शेती पूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग आणि मिलेट लागवड, या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, या वेळी शेतकरी मार्गदर्शिका पुस्तकाचे प्रकाशन आणि वाटप करण्यात आले,त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना बियाणे देखील वाटत करण्यात आले, तालुक्यातील शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणात तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुरक शेती आणि प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना या विषयी माहिती देण्यात आली, या वेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि सहाय्यकांनी विविध उत्पादना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,


हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी या वेळी व्यक्त केला, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत राहुन त्यांच्या कष्टाला योग्य त्या मदतीची आणि सन्मानाची जोड देणे हिच खरी सामाजिक बांधिलकी आहे असे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे,शेतकऱ्यांचे ज्ञान , जिद्द आणि मेहनत यांचा गौरव करत सर्व शेतकरी बांधवांना आगामी काळात सुरक्षित आणि यशस्वी होण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहटोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधिर गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य सविता सुधिर गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किसन कथोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत, कार्यक्रमात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!