बदलापूर! हिंदी शिक्षा प्रसार मंडळांचा माजी अध्यक्ष मनोज शुक्लावर लैंगिक शोषणाचा गुन्हा,,, अश्लील फोटो व्हायरल,,शिक्षण संस्थे मधुल हाकालपट्टी

कुळगाव बदलापूर पुर्व परिसरातील “हिंदी शिक्षा प्रसार मंडळ”, संस्थेचा वादग्रस्त मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू असतानाच, हिंदी शिक्षा प्रसार मंडळ संस्थेचा माजी अध्यक्ष तसेच कुळगाव बदलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनोज शुक्ला याचा संतापजनक कारानामा समोर आला आहे,मनोज शुक्ला आणि एका महिलेचे अश्लील फोटो, सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत, प्रकरण एवढ्यावरच थांबले नसुन मनोज शुक्ला याच्या विरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात एका महिलेने अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक शोषणाचा गुन्हा देखील दाखल केला असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे, या बाबत संस्था चालकांनी गंभीर दखल घेत, एक महत्त्वाचा ठराव घेऊन मनोज शुक्ला याचे सभासत्व कायम स्वरुपी रद्द करुन त्याची संस्थे मधुन हाकालपट्टी केली आहे, मनोज शुक्ला याचे एका महिले बरोबर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले अश्लील फोटो आणि अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झालेला लैंगिक शोषणाचा आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्ह्या मुळे संस्थेची बदनामी होत असल्याचे संस्था चालकांनी म्हटले आहे, मनोज शुक्ला यांनी केलेल्या कृत्याचा शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच पालकवर्ग यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने असा व्यक्ती संस्थेचा सदस्य असणे हे संस्थेच्या हितास धोका निर्माण करण्या सारखे असल्याने मनोज शुक्ला याची तातडीने संस्थे मधुनच हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अहमद खान, उपाध्यक्ष रमेश जैन यांनी दिली आहे,



