क्राइम

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,, अवैध पिस्टलासह आरोपी अटकेत,,”

मां, पोलिस अधीक्षक डॉ श्री डि एस स्वामी ठाणे जिल्हा ग्रामीण तसेच श्री अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, यांनी ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात अवैध धंदे, अवैध अग्निशस्रे, पाहिजे,फरारी शोध या बाबत प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी सक्त आदेश दिले असता, श्री संदीप गीते पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे , अग्निशस्रे, पाहिजे फरारी आरोपी, शोध बाबत गोपनीय माहिती मिळवुन कारवाई करणे कामी, स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करून मार्गदर्शन केले,
सदर पथकाकडून अवैध धंदे, अवैध अग्निशस्रे, पाहिजे फरारी शोध कामी जिल्ह्यात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारांकडुन अवैध पिस्टल बाळगल्याप्रकरणी माहिती मिळाली , प्राप्त माहितीनुसार पडताळणी करून पथकाने, दिनांक १४/१०/२०२५ रोजी रात्री ००:१० वाजता,चेरपोली गाव बाबचा धाब्या समोरील मैदानात शहापूर येथे ईसम नामे दिलनवाज उर्फ दिलावर मोहम्मद शेय वय वर्ष ४५ राहणार वाफे पाडा,बि १०४ शिवशक्ती, शहापूर जिल्हा ठाणे यांच्याकडे कोणताही परवाना नसताना एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस,असा एकूण ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्वतःच्या कब्जात विनापरवाना बाळगून ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करुन मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेतले, पोलिस हवालदार सुर्वे स्थागुशा यांनी शहापूर पोलिस ठाणे येथे, सरकार तर्फे फिर्याद देऊन, शहापूर पोलिस ठाणे येथे दिनांक १४/१०/३०२५ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३२५ सह महाराष्ट्र पोलीस अधि, कलम ३७(१)(३) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवकुमार जाधव करत आहेत,


सदरची कार्यवाही डॉ श्री डि एस स्वामी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच मा श्री अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्री संदीप गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री महेश कदम, भाऊसाहेब गायकवाड, श्री दिपेश किणी,सफौ/,प्रकाश साईल,पोह/संतोष सुर्वे,पोशि/स्वप्निल बोडके या पथकाने कौशल्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली असून गुन्ह्याचा पुढिल तपास शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करत आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!