“चेन्स स्नॅचरला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पथकाला मोठ यश”

दिनांक २/१०/२०२५ दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौजे मानिवली फाटा तालुका भिवंडी यातील फिर्यादी यांची आई मानिवली फाटा ते सुर्यानगर, अशी पायी चालत जात असताना समोरून येणारी होंडा कंपनीची,काळ्या रंगाची मोटर सायकल न,एम एच ०४/८८९१ हिचेवर बसलेल्या अनोळखी आरोपीत,याने फिर्यादी यांच्या आईचे, समोर येऊन, त्यांच्या गळ्यातील ९.१५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ७००००/रुपये किंमतीचा माल, जबरदस्तीने खेचून घेवून, पळून गेला, या बाबत फिर्यादी श्री प्रल्हाद राजाराम ठाकरे,वय वर्ष ३० राहणार सुर्यानगर मालबिड पो,दुगाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे, यांनी फिर्याद दिली असल्याने, गणेशपुरी पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक १८१/२०२५ दाखल करण्यात आला,
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा श्री डॉ डि एस स्वामी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच मा, श्री अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे कामी, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण व गणेशपुरी पोलिस ठाणे यांना आदेश देऊन, मार्गदर्शन केले,त्याच प्रमाणे श्री संदीप गीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी तसेच श्री कमलेश बच्छाव प्रभारी अधिकारी, गणेशपुरी पोलिस ठाणे, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले,

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सि सि टिव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या कडून प्राप्त माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषण करून ईसम नामे रुशांत बाळु चौधरी,वय वर्ष ३३ रा,कोशिंबडे पो,पिवळी, तालुका शहापूर,यास ताब्यात घेऊन, त्याच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने कौशल्यपुर्ण तपास करीत असताना,त्याने उपरोक्त गुन्हा तसेच १) वाशिंद पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२४ बि एन एस,३०९(४)३(५)व २) शहापूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५५/२०२५ बि एन एस ३०९(४)३(५) असे अजुन ०२ गुन्हे केल्याची कबुली देऊन,वरिल तिन्ही गुन्ह्यातील २,१९०००/रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने गुन्हा करणेकामी वापरलेली होंडा एक्स्ट्रडर मोटर सायकल क्रमांक एम एच ०४ जि, एक,८८९१ अशी काढून दिल्याने,ती जप्त करण्यात आली आहे,आरोपीतास कामी गणेशपुरी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहेत,
सदरचा गुन्हा मा श्री डॉ डि एस स्वामी, पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण,मा श्री अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री महेश कदम,पो,हवा/संतोष सुर्वे, गोविंद कोळी,पो शी/स्वप्नील बोडके,पोशि/धिंदळे तसेच श्री कमलेश बच्छाव प्रभारी अधिकारी गणेशपुरी पोलिस ठाणे, पोलिस उपनिरीक्षक श्री ऊमेश खिरड, या पथकाने कौशल्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली आहे,पुढिल तपास गणेशपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ऊमेश खिरड करत आहेत,




