क्राइम

बदलापूर पुणे सोलापूर ते विशाखापट्टणम परिसरात ड्रग्स गांजा तस्करी, १३ जणांवर कल्याण पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

कल्याण परिमंडळ ३ पोलिस सहआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

हाय प्रोफाईल ड्रग्स आणि गांजाचा धंदा करणाऱ्या टोळीचा कल्याण खडकपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे,आगस्ट महिन्या मध्ये गांजा तस्करी करणाऱ्या एका आरोपीला कल्याण खडकपणा पोलिसांनी अटक केला असताना, चौकशी दरम्यान गांजा आणि ड्रग्स चे मोठे रॅकेट हे विशाखापट्टणम या ठिकाणाहुन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस सहआयुक्त अतुल झेंडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार,आपली टिम विशाखापट्टणम या ठिकाणी पाठवुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोंबिंग ऑपरेशन करत यातील काही आरोपी अटक केले आहेत, या बाबत अधिक तपास करताना हे रॅकेट सोलापूर,पुणे बदलापूर सह अनेक मोठमोठ्या शहरात कार्यरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे,

पोलिसांनी विविध शहरातुन एकुण १३ आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतुल झेंडे यांनी दिली आहे, आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा,वाहने आणि पिस्तूल आणि वॉकी टाकी सह ७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अमली पदार्थाची तस्करी या संपूर्ण सिंडिकेटवर तेलंगणा, ठाणे मुंबई आदी ठिकाणी 20 पेक्षा जास्त विविध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!