महाराष्ट्र
बदलापूर! शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश सहसचिव एकनाथ शेलार यांच्याकडून शेतकऱ्यांना पाच लाखांची मदत,,,
पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी विभागाकडे सुपूर्द

शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश सहसचिव एकनाथ शेलार यांनी पुरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे, या बाबतचा पाच लाख रुपयांचा धनादेश एकनाथ शेलार यांनी मुख्यमंत्री सहायता निधी विभागाकडे सुपूर्द केला आहे,
महाराष्ट्र राज्यात पावसाने घातलेल्या धुमाकूळी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, या मध्ये सर्वाधिक नुकसान हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे,याच अनुषंगाने आपण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही मदत केली असल्याचे एकनाथ शेलार यांनी सांगितले आहे, आपण स्वतः मराठवाड्याचा दौरा केला असुन, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा पाहून मी देखील शेतकरी असल्याने खुपच वेदना झाल्या असल्याचे एकनाथ शेलार यांनी म्हटले आहे, एकनाथ शेलार हे बदलापूर शहरा जवळील वांगणी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असुन ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत, राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असुन शिवसैनिकांनी शक्य तितकी मदत शेतकऱ्यांना करण्याचे आवाहन एकनाथ शेलार यांन केले आहे




