लोकल न्यूज़

बदलापूर! ऊल्हासनदी पात्रात २० वर्षिय तरुण वाहुन गेल्याची घटना,,,,

प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

  1. ⊗कुळगाव* बदलापूर पश्चिम बॅरेज रोड परिसरातील ऊल्हासनदी पात्रात दिनांक २७ सप्टेंबर रोजी एक विस वर्षिय युवक वाहुन गेला असल्याची घटना घडली आहे,
    आंबरनाथ मध्ये राहणारा विस वर्षिय तरुण मोहम्मद गौस अब्दुल्ला शेख हा दिनांक २७/९/२०२५ रोजी आपल्या दोन भावांसह बदलापूर या ठिकाणी आला असताना अंगावरील कपडे खराब झाल्याने बॅरेजरोड परिसरातील नदी पात्रात कपडे धुत असताना तोल जाऊन मोहम्मद गौस अब्दुल्ला शेख याचा तोल जाऊन तो नदी पात्रात वाहुन गेला, बरोबर असलेल्या त्याच्या भावांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मोहम्मद याला वाचवण्यात यश आले नाही, या बाबत तहसीलदार आंबरनाथ यांनी स्वतः घटनास्थळी येऊन चौकशी केली असून त्यांच्या मार्फत तरुणाला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे ,त्याच प्रमाणे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अग्निशमन दल तसेच पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून देखील शोध मोहीम सुरू असुन वाहुन गेलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!