देश

ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का? भारत-पाक सामन्यावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

अडीच वर्षे येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे ना? असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.

मुंबई मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली, आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राणेंचा कार्यक्रम होत असल्याने नितेश राणे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे नितेश राणेंनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतः मंत्री, वडील मुख्यमंत्री होते तरी कोळीवाड्याची परिस्थिती बदलवू शकला नाही, 6 हजारांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नव्हे. सध्या ते राजकीय व्हेंटिलेटवर आहेत, आम्ही 2029 मध्ये दाखवू, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर, भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिलं.

अडीच वर्ष येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे नाअसा खोचक टोला नितेश राणेंनी लगावलातसेच, उद्धव खानला विचारायचे आहे, विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का, हिरवा गुलाल का? तेव्हा पाकचा राग आला नाही का?. मिरवणुकीत सर तन से जुदा असे नारे दिले गेले त्यांचे राजीनामे घे ना. उद्धव ठाकरेंच्या कालावधीत 5 वर्षे महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता, असे म्हणत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

अस्लम शेखने मिनी पाकिस्तान मालवणीला बनवून ठेवल आहे, सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाझेसोबत बुकी होताआताहे भारत पाक मॅचबद्दल बोलतातजिहादी हृदय सम्राटकडून राष्ट्रभक्तची गरज नाहीपरेशन सिंदूरवेळी हा लंडनमध्ये बसलेलातेव्हा लंडनमध्ये कोणत्या बारमध्ये होता हे दाखवू का? तेव्हा तुम्हाला हिंदूत्व का नाही आठवलंथंड हवा तिथे खात होताअसे म्हणत आशिया चषकातील सामन्यावरुन शिवसेनेनं सुरू केलेल्या आंदोलनावर राणेंनी भाष्य केलंआदित्य ठाकरे स्वतबुरख्यात लपून उद्या मॅच बघेलआवाज पण मॅच करेलपाकिस्तान जिंदाबाद असे नारे तो लावेलअसे म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी नक्कल केलीतरसंजय राऊत हा मरीन ड्राईव्हवर तिकीटाचे ब्लॅक करताना सापडेलअसेही त्यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!