Uncategorized

बदलापूर नगरपालिका प्रशासनाचा अतिक्रमण हटवण्याचा तमाशा,, लाखो रुपयांचा चुराडा,,,,

मागील काही दिवसांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांनी “कर्तव्य दक्ष”❓ अधिकारी म्हणून बदलापूर शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेऊन मोठा गाजावाजा करून कारवाईला सुरुवात केली,

बदलापूर पुर्व आणि पश्चिम परिसरात अनेक लहान सहान बांधकाम अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आली, पण याच लहान सहान बांधकामांच्या बाजूला उभ्या असलेल्या अनाधिकृत प्रशस्त ईमारतींना हात लावण्याची हिम्मत मारोती गायकवाड यांनी दाखवली नाही, अतिक्रमण कारवाईला शिवसेना पक्षाकडून मोठ्याप्रमाणात विरोध करण्यात आला, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी प्रचंड दबाव तंत्राचा वापर करून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी भाग पाडले,अधुन मधुन छोटी मोठी कारवाई नगरपालिका प्रशासन करत आहे, परंतु मुळ मुद्दा असा आहे की अतिक्रमण कारवाई केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा तीच बांधकाम जशीच्या तशी उभी राहत आहेत, आणि असे प्रकार मागच्या अनेक वेळे पासून सुरू आहे, तुम्हाला जर पारदर्शक कारवाई करयचीच
नाही तर कारवाईची नाटक नगरपालिका प्रशासन करत कशासाठी? अतिक्रमण कारवाई करताना लाखो रुपये खर्च होत असतात, हे पैसे सर्व सामान्य नागरिकांच्या घामातून भरलेल्या कराच्या माध्यमातून वाया घालवायचा अधिकार मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांना कोणी दिला? शहरातील अनेक ठिकाणी शासकीय जागांवर तसेच नगरपालिका प्रशासनाने टि, डि, आर दिलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, आणि बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामांच तर पिकच बदलापूर शहरात आलेल आहे,खर पाहता अतिक्रमण कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्ती जर त्याच जागेवर थांड मांडुन बसत असेल तर कायदेशीर कारवाई करुन त्या ठिकाणी पडलेला मलबा नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने उचलुन जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, परंतु, पालिका प्रशासनाकडून या नियमांच पालन केल जात नाही, त्या मुळे त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा तिच तिच अतिक्रमणे ऊभी राहत आहेत, बदलापूर शहरला अनाधिकृत बांधकामुळे आलेला बकालपणा दुरुस्त करुन सुंदर शहर बनवण्याचा मुख्याधिकारी मारोती गायकवाड यांची भावना अतिशय चांगली आहे,पण थोडी अधिक हिम्मत दाखवण्याची गरज आहे, राजकीय दबाव तर येतच राहणार,,कारण अतिक्रमण करणारे आणि बेकायदेशीर बांधकाम करणारे हे सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांचे चट्टे बट्टे आहेत, सर्वच्या सर्व राजकारणी हे भ्रष्टाचाराने बरबरटले आहेत,शहराच वाटोळ झाल तरी चालेल पण आपले खिसे भरले पाहिजेत हिच भूमिका त्यांची कायम स्वरुपी राहिली आहे, त्या मुळे पारदर्शक आणि स्वच्छ कायदेशीर नियमांचा पालन करून कारवाई होत असेल तरच करा नाहीतर ही कारवाईची नाटक बंद करा आणि होणारा लाखो रुपयांचा चुराडा त्वरित थांबवा,,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!