Uncategorized

वसई कॉग्रेस भवनात भाजपा जिल्हाध्यक्षांचा अनाधिकृत प्रवेश,, प्रदेश कॉग्रेस पर्यावरण विभागा कडून कारवाईची मागणी,,, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल,,

वसई कॉग्रेस भवनात भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाधिकृतरित्या प्रवेश करुन पक्षाच्या सन्मानिय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी कॉग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समिर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे,


दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई पारनाका येथील पक्षाच्या खाजगी मालमत्ते मध्ये तालुका कॉग्रेस भवनात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील आणि तिच्या साथीदारांनी बेकायदेशीर आणि चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून, कॉग्रेस पक्षाच्या सन्माननीय नेत्यांच्या विरोधात, असभ्य वर्तन करुन, बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, या वेळी कॉग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समिर वर्तक यांच्यासह, पक्षाचे पदाधिकारी प्रकाश पाटील,रतन तिवारी,साबिर शेख,ॳॅंथोनी डाबरे,राईस फरेल आणि कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!