त्यागमूर्ती माता रमाई जयंती जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद शाळा कांदळी, भिवंडी येथे 7 फेब्रुवारी 2026 रोजी त्याग मूर्ती माता रमाई जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
*माता रमाई यांचे प्रतिमेला ग्रामपंचायत कांदळी सरपंच नम्रता जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले

ग्रामपंचायत कांदळी सरपंच नम्रता जाधव व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी यांचा शाल व पुष्पहार देऊन जयश्री पष्टे मॅडम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षिका जयश्री पष्ट मॅडम यांनी केले.
*शिक्षक अशोक गायकवाड यांनी रमाईच्या जीवनकार्यावर प्रबोधन पर मार्गदर्शन करून मात रमाईला अभिवादन केले

*विद्यार्थ्यांनी रमाईच्या जीवनावर भाषणे सादर केली तर रमाई गीतावर संदर नृत्य सादर केले*
*आता रमाई जयंती निमित्त शिक्षक अशोक गायकवाड यांनी शाळेला रमाईची प्रतिमा भेट दिली*
विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले.
शिक्षक अशोक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले,
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत कांदळी सरपंच नम्रता जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी, अंगणवाडी सेविका कविता जाधव, अंगणवाडी मदतनीस गोदावरी जाधव, मुख्य शिक्षिका जयश्री पष्टे, शिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.





