क्राइम

बदलापूर! पत्रकार श्रध्दा ठोंबरे हल्ला प्रकरणी, एकुण सहा महिलांवर गुन्हा दाखल,,

कुळगाव बदलापूर पत्रकार श्रध्दा ठोंबरे हल्ला प्रकरणी बदलापूर पुर्व पोलिस ठाण्यात सहा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाचे स्विकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संदर्भातील निनावी आलेले पत्र आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केल्या बाबत प्रविण राऊत समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत बदलापूर पुर्व पोलिस ठाण्यात मोर्चा नेऊन, श्रध्दा ठोंबरे यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती,

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची पहिलीज जनरल सभा असल्याने श्रध्दा ठोंबरे ह्या वृत्तांकन करण्यासाठी नगरपालिकेत आल्या असताना त्या ठिकाणी प्रविण राऊत यांच्या महिला समर्थकांनी श्रध्दा ठोंबरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु श्रध्दा ठोंबरे यांनी आपली व आपल्या सहकाऱ्यांची कशी बशी सुटका करून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली असताना, प्रविण राऊत यांच्या महिला समर्थकांनी पोलीस ठाण्या समोरच श्रध्दा ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करुन दगडांनी गाडीची तोडफोड करुन श्रध्दा ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करत असताना बदलापूर पुर्व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करून पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले याच वेळी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे ईतरही काही पोलीस अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, पोलिस अधिकाऱ्यां समोर आणली पोलिस ठाण्या समोरच हा प्रकार घडला असल्याने बदलापूर पुर्व पोलिसांनी सावधगिरी बाळगत प्रकरण हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे,

 

पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांच्यावर हल्ला होत असताना त्यांनी आपल्या मोबाईल फोन मधुन चित्रिकरण सुरू ठेवले असल्याने झाल्या प्रकाराची माहिती संपूर्ण शहरात पसरली, पत्रकारांवर अशा प्रकारे कायदा हातात घेऊन झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शहरातील सर्व पत्रकारांनी बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन, पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे, या बाबत बदलापूर पुर्व पोलीसांनी एकुण सहा महिलांवर, भारतीय न्याय संहिता बि एन एस कलम 79,352,351(2) 126,188( 1) 190,191(2),324 (4),189(2) नुसार गुन्हा दाखल केला असून, व्हायरल व्हिडिओ मधिल मारहाण करत असलेल्या महिलांचा बदलापूर पुर्व पोलीस शोध घेत असल्याची माहिती बदलापूर पुर्व पोलिसांनी दिली आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!