बदलापूर मध्ये महिलांच्या अंडाशयाची तस्करी उघड,,, बदलापूर पोलिसांकडून पर्दाफाश,,,तिन महिला डॉक्टरांना अटक,,

आर्थिक विवंचनेत असलेल्या गोरगरीब महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चक्क त्यांच्या अंडाशयाची तस्करी केली जात असल्याचा भयानक प्रकार बदलापूर पुर्व पोलीसांनी उघडकीस आणला आहे,
बदलापूर शहरात घडत असलेली ही संतापजनक घटना आहे, बदलापूर पुर्व जुवेली गावात राहत असलेली महिला नामे सुलक्षणा गाडेकर आणि उल्हासनगर या ठिकाणी राहत असलेल्या तिच्या साथिदार महिला अश्विनी चाबुकस्वार व मंजुषा वानखेडे, ह्या गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भातील स्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारी इंजेक्शन त्यांना देत होत्या,त्याच प्रमाणे बेकायदेशीर सोनोग्राफी देखील करुन, महिलांच्या गर्भातील अंडाशयाची वाढ झाल्या नंतर अशा महिलांना सुलक्षणा गाडेकर ही आय व्ही एफ सेंटर मध्ये पाठवुन त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून गर्भाशयातील अंडाशय काढून त्याची मोठ्या संख्येने विक्री केली जात होती,अशाच प्रकाराच्या एका पिडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून,हा सर्व प्रकार कथन केल्या नंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पुर्व आणि पश्चिम पोलिस ठाण्यात या बाबत सविस्तर तक्रार नोंदवली,घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बदलापूर पुर्व क्राईम पि आय राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने तपासणी चक्रे फिरवत जुवेली गावात राहत असलेली महिला सुलक्षणा गाडेकर हिच्या घरावर छापा टाकून त्या ठिकाणी गर्भाशयासाठी वापरण्यात येत असलेल्या इंजेक्शन चे फोटो, सोनोग्राफी फोटो, खोटी, प्रतिज्ञापत्र काही महिलांचे फोटो आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन सुलक्षणा गाडेकर आणि तिच्या साथिदार महिला अश्विनी चाबुकस्वार व मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या वर गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२)१४३(३)३१८(४)३३५,३३६,(३)३३७,३३९,३४०(२)१२५,२७१,२७२’सह तंत्रज्ञान अधिनियम कायदा २०२१ चे कलम २८,२९,३३ सह ओषधी द्रव व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० चे कलम २७ बी १८(c) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे,सदर आरोपी महिलांना मा, न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, पुढील तपास बदलापूर पुर्व पोलिस करत आहेत,
https://www.facebook.com/share/v/1EHvNWr5gg/




